गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग ज्युनिअर कॉलेजमध्ये चिखल महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या चिकल महोत्सवाचा आनंद विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लुटला.
यामध्ये विद्यार्थिनींनी रस्सीखेच, लगोरी, लंगडी अशा विविध खेळांचा आनंद घेतला. प्राचार्य आर.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याचे नियोजन आर. एस. मठपती, प्रा. एस. एम. वडर, प्रा.एस.जी.खानापुरे, प्रा. एम. एम. पानारी, प्रा. जे. एस. जाधव, पी. व्ही. मुंगुरवाडी, प्रा. एस. व्ही. भोगाणे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.



