राधानगरी, चंदगड, कागल विधानसभा मतदार संघाची जबाबदारी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राधानगरी, चंदगड, कागल विधानसभा सहसंपर्कप्रमुख पदी रियाजभाई शमनजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे सदर माहिती कळविण्यात आली आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघात रियाजभाई शमनजी यांची समाजकार्यातून एक वेगळी ओळख आहे. ठाकरे पक्ष शिवसेनेचे एक कट्टर व कडवट शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रति निष्ठा ठेवून आजपर्यंत त्यांची प्रामाणिकपणे वाटचाल सुरू आहे. समाजातील गोरगरीब, जनसामान्य, वंचित लोकांच्या पाठीशी उभे राहत त्यांना मदतीचा हात व आधार देण्याचे काम रियाजभाई शमनजी करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रियाजभाई शमनजी यांना सहसंपर्कप्रमुख पद देऊन त्यांचा सन्मान केल्याने पक्ष वाढीच्या कार्याबरोबरच समाजकार्याला देखील बळ मिळाल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

