कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण, मुलांना खाऊ, शैक्षणिक साहित्य वाटप
विविध मान्यवरांकडून, जनतेतून शुभेच्छांचा वर्षाव
कोल्हापूर : ठाकरे शिवसेना पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी कागल तालुक्यात विविध ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानिक शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व कट्टर शिवसैनिक डॉ. रियाजभाई शमनजी होते.
यावेळी विद्या मंदिर म्हाकवे येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, डॉ. रियाजभाई शमनजी, कागल तालुकाप्रमुख शिवगोंड पाटील, विकास पाटील, शिवानंद माळी , मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील , रामा पाटील, दिपाली घोरपडे, शुभांगी पाटील, आदिनाथ पाटील, दिनकर लगारे, वैभव आडके, अमित पाटील, मारुती कुंभार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व खाऊ वाटप करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपण देखील करण्यात आले.
विद्या मंदिर शेंडुर येथे देखील कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. रियाजभाई शमनजी, तालुकाप्रमुख शिवगोंड पाटील, बाबुराव शेवाळे, अमर शेवाळे, मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील , रामा पाटील, दिपाली घोरपडे, शुभांगी पाटील, आदिनाथ पाटील, दिनकर लगारे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुमार विद्यामंदिर सांगाव येथे वह्या व खाऊ वाटप तर कागलमध्ये संत रोहिदास विद्या मंदिर येथे वह्या व फळांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय मुरगुड या ठिकाणी रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, डॉ. रियाज शमनजी, तालुकाप्रमुख शिवगोंडा पाटील, मारुती परिबुवा, दिनकर लागारे, बाबुराव शेवाळे, वैभव आडके, दिग्विजय पाटील, रामा पाटील, दिपाली घोरपडे, शुभांगी पाटील, आदिनाथ पाटील विकास पाटील उत्तम पाटील, आदिनाथ पाटील, अमर शेवाळे उपस्थित होते.








