Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तब्बल आठ दिवसानंतर भडगाव पुलावरून वाहतूक सुरु ; पुराचे पाणी ओसरले

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु 


अग्निशमन यंत्रणेच्या साह्याने रस्त्याची स्वच्छता



भडगाव : भडगाव पुलावरील पुराचे पाणी ओसरल्याने तब्बल आठ दिवसानंतर पुलावरून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.                                           (छायाचित्र वसंत नाईक, भडगाव)


गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीच्या पुराचे पाणी मध्यरात्री एक वाजता ओसरले असून भडगाव पुलावरून वाहतूक सकाळपासून सुरू झाली आहे. तब्बल आठ दिवसानंतर गडहिंग्लज - चंदगड मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे टीम सकाळपासून खड्डे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे


भडगाव : पुराच्या पाण्याने पुलाला लागून असा मोठा खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुजवण्याचे काम हाती घेतले आहे.                    (छायाचित्र : वसंत नाईक )


गेल्या आठवड्यात तालुक्यात संततधार पाऊस झाल्याने हिरण्यकेशी नदीला पूर आला होता. भडगाव पुलावर पाणी आल्याने या मार्गावर वाहतूक बंद होती. रविवारपासून पाऊस थांबल्याने पुराचे पाणी हळूहळू ओसरत होते. काल पुलावर अर्धा फूट पाणी असताना वाहतूक सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र पुलानजीक भडगावच्या दिशेने मोठा आडवा खड्डा पडल्याने दुरुस्तीनंतरच वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


हे खड्डे देखील पाण्यातच असल्याने रात्री खड्डे दुरुस्तीचे काम करता आले नव्हते. मध्यरात्री एकच्या दरम्यान पुलावरील पुराचे पाणी ओसरले. आज सकाळपासून वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी  श्री गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सकाळपासून हाती घेण्यात आले आहे. अग्निशमन यंत्रणेच्या साह्याने पुलाची स्वच्छता देखील करण्यात येत आहे. या ठिकाणी पोलीस पाटील उदय पुजारी, ठाकरे पक्ष शिवसेनेचे उप तालुका प्रमुख वसंत नाईक कार्यरत आहेत. वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांची खबरदारी घेत वाहने  चालवण्याचे आवाहन ते करत आहेत. 









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.