छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आजरा तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. या नदीवरील भडगाव पुलावरून वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे.
गडहिंग्लज तालुक्यात मात्र पावसाला अजून जोर नाही. तालुक्याच्या हलकर्णी भागात तर अधूनमधून पाच दहा मिनिटेच पाऊस होत आहे. मान्सूनच्या पावसाला या भागात जोर नसल्याचे दिसते.




