गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महागाव येथे सालाबद प्रमाणे मोहरम सण साजरा होत आहे. त्यानिमित्त मोहरम कमिटी मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रविवार दि. ७ रोजी रात्री कुदळ मारणे, गुरुवार दि. ११ रोजी पाचवी पीरनालसाब बसणे, शनिवार दि.१३ रोजी सातवी रात्री पीरनालसाब गावात आगमन, सोमवार दि.१५ खत्तल रात्र, मंगळवार दि.१६ रोजी शाहदत ताबुत विसर्जन होणार आहे.
मोहरम यशस्वीपणे पार पा डण्यासाठी फिरोज सोलापुरे, अशपाक मुरसल, आशिफ खलिफा, महमदईलीयास पठाण, गुलाब हवळे, दस्तगीर सोलापुरे, रसूल कुंदरगी, मुन्ना हावळे, शब्बीर मूगळे, इस्माईल तकिलदार, रमजान अत्तार, नशीब मुजावर, आली मनेर, इनायत हावळे, जावेद मुगळे, मुल्ला परिवार यांच्यासह गावातील हिंदू-मुस्लिम ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

