Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी 'त्या दुचाकीस्वाराचा केला थरारक पाठलाग.... मात्र कशासाठी...? त्याचा पडलेला मोबाईल परत देण्यासाठी!

सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक व तानाजी कुरळे यांनी घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन 

        


गडहिंग्लज : रस्त्यावर पडलेला मोबाईल संबंधित मालकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करताना सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक व पोलीस पाटील तानाजी कुरळे.


गडहिंग्लज (प्रतिनिधी) : माणसाच्या अंगी प्रामाणिकपणा, स्वाभिमान एकदा भिनला की आयुष्यभर ती माणसे आपल्या तत्वाशी एकनिष्ठ असतात. प्रलोभने, अमिषे दाखवली तरी ते कधीच विरघळत नाहीत. नकळत मिळालेल्या वस्तू, पैसे यांचा मोह त्यांना कधीच जडत नाही. उलट ते परत करून मिळालेल्या आनंदातच ते समाधान मानतात . आज अशीच एक घटना गडहिंग्लज-भडगाव मार्गावर घडली. एका दुचाकीस्वाराचा नकळतपणे रस्त्यावर पडलेला महागडा मोबाईल त्याला परत करण्यासाठी दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क आपल्या जीवाची परवा न करता वाहन कोंडीतून वाट काढत त्या दुचाकीस्वारापर्यंत पोहोचले. तब्बल पाचशे मीटरचा थरारक पाठलाग करत प्रामाणिकपणे तो महागडा मोबाईल परत करून आपला प्रामाणिकपणा जपल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.




याबाबतची अधिक माहिती अशी की , आज दुपारी १२.४५ वाजता मौजे भडगांव येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक हे आपल्या हिरो होंडा या दुचाकीवरून भडगावला चालले होते. सोबत चन्नेकुपी गावचे पोलीस पाटील तानाजी कुरळे हे देखील होते. मराठा चित्रमंदिर जवळ समोरून गडहिंग्लजकडे दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा किंमती मोबाईल अचानक रस्त्यावर पडला आणि तो त्यांच्या लक्षात आला नाही. ते तसेच वेगाने पुढे निघून गेले. दरम्यान, वसंत नाईक यांनी तो मोबाईल इतर वाहनांखाली चिरडू नये याची दक्षता घेत सतर्कतेने रस्त्यावर पडलेला मोबाईल घेतला. आणि तातडीने  त्या दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. वाहनांच्या गर्दीमुळे तो दुचाकीस्वार नजरेआड होत होता त्यातच वाहनांची कोंडी. यातून वाट काढत दोघांनी जवळजवळ पाचशे मीटरचा पाठलाग करून त्यांनी त्या दुचाकीस्वाराला गाठत त्यांचा किंमती मोबाईल त्यांना परत केला. सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक व पोलीस पाटील तानाजी कुरळे यांच्या प्रामाणिकपणाबदल त्यांनी दोघांचे आभार मानले. सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक व पोलीस पाटील तानाजी कुरळे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा निश्चितच कौतुकास्पद आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.