Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुका मराठी अध्यापक संघातर्फे "गौरव गुणवंतांचा सोहळा आनंदाचा"



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत मराठी विषयात उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव गुणवंतांचा सोहळा आनंदाचा हा सोहळा माध्यमिक पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र खोराटे होते.




कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक कोजिमाशिचे संचालक सचिन शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार प्रकाश चौगुले  व शिवाजी विद्यालय महागावच्या पर्यवेक्षक पदी दिनकर गुरव यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी विषयात ९५ गुणांपेक्षा जास्त गुण संपादन केल्याबद्दल ४२ विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र राजेंद्र खोराटे, दिनकर गुरव, रावसाहेब मुरगी, सचिन शिंदे, प्रकाश चौगुले यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. सुनंदा माने, दिनकर गुरव यांची भाषणे झाले. राजेंद्र खोराटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.




यावेळी डी. एम. मोकाशी, अशोक पाटील, वाय व्ही तरवाळ, रमेश चौगुले, सुधीर गुरव, स्नेहा पारडे, अनिल लोखंडे यांच्यासह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन हराडे यांनी केले. आभार संपत सावंत यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.