Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु; इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन



संचालक डॉ. प्रमोद नाईक यांची 'दिलखुलासव 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

            



मुंबई : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील युवकांना चांगले करिअर घडविण्याची आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश नोंदणी करावीअसे आवाहन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

            


महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने अलिकडच्या काळात कौशल्य विकास उपक्रमांवर विशेष भर दिला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच युवकांना चांगले करिअर आणि  व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत विविध योजना आणि उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकारचे अभ्यासक्रमप्रवेश प्रक्रिया,अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध रोजगाराच्या संधी अशा विविध विषयांवर संचालक डॉ. नाईक यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.