वाडी क्रमांक-2 शाळेकडे जाणारा रस्ता बनला चिखलमय
विद्यार्थ्यांना चिखलातून कसरत करत येण्याची वेळ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील भडगाव पैकी गणेश नगर (राजमाने तळ) येथील वाडीशाळा क्र२ कडे जाणारा रस्ता चिखलमय झाला आहे. या चिखलातून कसरत करत शालेय विद्यार्थ्यांना ये -जा करावे लागत आहे. त्यामुळे आमच्या मुलांनी दरवर्षी पावसाळ्यात चिखल तुडवतच जायचे का? या रस्त्याचा प्रश्न केव्हा सुटणार? अशी विचारणा पालक वर्गातून होताना दिसत आहे.
या शाळाकडे मुकणार वाडी, करगुपी तळ, धनवडे तळ, राजमाने तळ, बेरडवाडी आदी भागातील मुले शिक्षणासाठी येथे येत असतात. मात्र अद्याप या भागातील रस्ता खडीकरण अथवा डांबरीकरण झालेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेला चिखलातूनच जावे लागते. प्रसंगी या चिखलातून वाट काढण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांनाच त्यामध्ये दगडे टाकून वाट काढत जावे लागत आहे. त्यामुळे शाळेकडे जाणाऱ्या या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालक वर्गातून होत आहे.
रस्त्याचे मुरमीकरण करण्याची गरज : वसंत नाईक
दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे सदर रस्त्याचे मुरमीकरण करून शालेय विद्यार्थ्यांना येण्या- जाण्यासाठी सोईचा रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी केली आहे.
व्हिडिओ येथे पहा 👇



