गडहिंग्लज : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील श्रीमती सावित्री आप्पाणा मनवाडे यांचे काल रात्री काकती (बेळगाव) येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन व नातवंडे असा परिवार आहे. तेरणी गावचे माजी सरपंच व जनता दलाचे माजी तालुकाध्यक्ष कै. रामाप्पाण्णा मनवाडे यांच्या त्या ज्येष्ठ सून होत. तेरणी येथे आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

