साखर-पेढे वाटप करून साजरा केला आनंदोत्सव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे ॲड.अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदार संघातून ज. मो. अभ्यंकर यांचा विजय झाल्याबद्दल गडहिंग्लज येथे शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने फटाक्यांची आतषबाजी व साखर- पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, विधान परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. उद्या विधानसभेवर देखील भगवा फडकेल. मुंबई कोणाची याचं उत्तर या निवडणुकीतून मतदारांनी दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेला मोठे यश मिळेल यात शंका नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात देण्याचे स्वप्न जनतेचे आहे, हे निश्चितच पूर्ण होईल. भविष्यातील निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवा सेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, संदीप चव्हाण, प्रकाश रावळ, स्वरूपा पेंढुरकर, शंकर गवळी, बाळू कडुकर, संतोष कदम, संजय पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



