Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र हत्तरगी, उपाध्यक्षपदी सुरेश कोळकी



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. रविंद्र हत्तरकी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुरेश कोळकी यांची निवड झाली. युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकित हा निर्णय झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ट फुटबॉलपटू महादेव पाटील होते. एम. आर. हायस्कुल सभागृहात ही बैठक झाली.




युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. अध्यक्षपदासाठी डॉ. हत्तरकी  यांचे नाव माजी अध्यक्ष मल्लिकार्जून बेलल्द यांनी सुचविले. श्री. कोले यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी श्री. कोळकी यांना संभाजीराव शिवारे हे सुचक तर प्रशांत दड्डीकर यांनी अनुमोदन दिले.  नव्या फुटबॉल हंगामाबाबत नियोजनाची माहिती अभिजित चव्हाण यांनी दिली.  संचालक सुनिल चौगुले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर शक्ती सुनिल चौगुले यांचे नाव सचिव दिपक कुपन्नावर यांनी सुचविले. संचालक भैरू सलवादे यांनी अनुमोदन दिले. नवोदित खेळाडूंच्या विकासासाठी ग्रासरूट  प्रमुख म्हणून राष्ट्रीय खेळाडू विक्रम पाटील तर युवा विभागाचे प्रमुख  सौरभ पाटील यांची फेरनिवड झाली. 



यंदापासून पुढील महिन्यात  पंधरा वर्षाखालील मुलांसाठी सुनिल चौगुले स्मुतीचषक स्पर्धा सुरु करण्याचा निर्णय झाला. यावर्षी आंतरराज्य फुटबॉल महाविदयालय स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले. शालेय स्पर्धा, दिवाळीत अखिल भारतीय स्पर्धा, बेबी लीग, उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, डेव्हलपमेंन्ट लीग हे उपक्रम कायम ठेवण्याचे ठरले. निवडीबद्ल डॉ. हत्तरकी, श्री. कोळकी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सौरभ जाधव, रोहित साळुखें यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.