Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पुलावर सलग पाचव्या दिवशी पुराचे पाणी कायम; वाहतूक ठप्पच

भडगावकडे पाचशे मीटर अंतरापर्यंत आले पुराचे पाणी 


संततधार पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय


तालुक्यातील सर्व बंधारेही पुराच्या पाण्यात; धरणे भरली तुडुंब 



भडगाव : येथे मुख्य मार्गावर जवळपास पाचशे मीटर अंतरापर्यंत आलेले हिरण्यकेशी नदीच्या पुराचे पाणी.
                                       (छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव) 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यात संततधार पाऊस झोडपून काढत आहे. हिरण्यकेशी नदीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती तालुक्यात  कायम असून भडगाव पुलावर सलग पाचव्या दिवशी पुराचे पाणी कायम आहे. आता भडगावच्या दिशेने पाचशे मीटर अंतरापर्यंत तर गडहिंग्लजमध्ये पेट्रोल पंपाजवळ पाणी आले आहे. पूरस्थितीमुळे गडहिंग्लज व भडगाव येथील नदीवेस भागातील नागरिकांना व जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. 



गडहिंग्लज तालुक्यात गेले आठवड्यावर संततधार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे गडहिंग्लज - चंदगड राज्यमार्गावरील भडगाव पुलावर तसेच ऐनापुर, गजरगाव, हरळी, निलजी, जरळी, नांगनूर बंधाऱ्यांवर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे नागरिकांचा गडहिंग्लजशी असणारा संपर्कच तुटला आहे. पाचव्या दिवशी तालुक्यात पूरस्थिती कायम आहे. जोरदार वारा व पावसामुळे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत बनले आह. 


गडहिंग्लज : शहरातील नदीवेस परिसरात विविध गल्ल्यांमध्ये हिरण्यकेशी नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. नगरपालिकेने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.
                      ( छायाचित्र : अशपाक किल्लेदार, गडहिंग्लज ) 


गडहिंग्लज शहरात नदीवेस भागातील परिस्थितीकडे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका यंत्रणा लक्ष ठेवून आहे. तसेच पोलीस, महसूल प्रशासन यंत्रणा देखील सतर्क असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले, गटविकास अधिकारी शरद मगर संपूर्ण पूरस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेची सर्व दृष्टीने दक्षता घेण्याच्या सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत.  भडगाव येथील पूरस्थितीकडे स्थानिक आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी पोलीस पाटील उदय पुजारी, शिवसेना ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, तलाठी सौ रुपाली कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.


           व्हिडिओ येथे पहा 👇👇




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.