Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हिरण्यकेशी नदीच्या पुराची व्याप्ती वाढली ; गडहिंग्लजमध्ये नदीवेस परिसरातील गल्ल्यांमध्ये पाणी

नगरपालिकेकडून नागरिकांसह जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर 


भडगावमध्येही जनावरांच्या गोठ्यांमध्ये पाणी ; जनावरे इतरत्र हलवली 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीच्या पुराच्या पाण्याने आता गडहिंग्लजमधील नदीवेस परिसर व्यापला आहे. येथील गल्ल्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नगरपालिकेने नागरिकांना स्थलांतरित केले आहे. दरम्यान, गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील भडगाव पुलावर पाणी कायम असून संपूर्ण पुलच पाण्याखाली बुडाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अद्याप ठप्पच आहे. भडगाव येथील नदी काठाजवळील घर, गोठा व दुकानांमध्ये देखील पाणी गेले आहे. येथील काही नागरिक आपल्या जनावरांसह स्थलांतर झाले आहेत.


                                      छायाचित्र : अशपाक किल्लेदार 


गडहिंग्लज तालुक्यात गेले आठवडाभर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हिरण्यकेशी नदीला पूर आला असून मोठ्या प्रमाणात पाणी पत्रा बाहेर पडले आहे. पुराच्या पाण्याची व्याप्ती झपाट्याने वाढत असून आता गडहिंग्लजमधील नदीवेस परिसरात असणाऱ्या गल्ल्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने येथील 15 हून अधिक कुटुंबांना  सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. नगरपालिका, पोलीस प्रशासन, महसूल व आपत्ती व्यवस्थापनची टीम पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कोणताही धोका पत्करून पुराच्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होताना दिसत आहे. सलग चौथ्या दिवशी देखील संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीतच आहे. वाहतूक ठप्प झाल्याने गडहिंग्लजचा संपर्क तुटला आहे.



भडगावात जनावरांच्या गोठ्यांमध्ये पुराचे पाणी, जनावरांचे स्थलांतर 


                                 छायाचित्र  : वसंत नाईक, भडगाव 

पुराचे पाणी  भडगाव पैकी कल्याणी तळ येथील भागातील   जनावरांच्या गोठ्या जवळ आल्याने  खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी   हालविण्यात आहे. नैसर्गिक  आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पोलीस पाटील उदय पुजारी, रविंद्र  शेंडूरे, सचिन हरळीकर, सामाजिक कार्यकर्ते वसंत  नाईक, संतोष  माने  राजू  कल्याणी, रविंद्र  बंदी, महादेव  रेगडे, राजू  कल्याणी, राजू  सनकी, सुरेश  रेगडे  मदत  कार्यात  सहभागी होते.





गावात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी 




भडगाव पुलावर गेल्या चार दिवसापासून पुराचे पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूकच बंद झाली आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रेते भडगाव येथे भाजीपाला विक्रीस ठेवल्याने गुड्डादेवी दूध संस्थेसमोर नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दुपारपासून या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ होती.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.