Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुद्धिबळ संयम आणि चपळतेचा खेळ : संपत सावंत

गडहिंग्लजला जागृती हायस्कूलमध्ये बुद्धिबळ दिन उत्साहात संपन्न 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): बुद्धिबळ हा अनाकलनीय खेळ असून यातील वैविध्यता दुसऱ्या कोणत्याही खेळात दिसत नाही. कोणत्याही दुखापतीची भीती न बाळगता हा खेळ खेळता येतो. चपळ, अस्थिर, खोडकर मुलांनी हा खेळ शिकला तर त्यांच्यात हळूहळू अमुलाग्र बदल दिसून येतो. खेळ झाल्यावर प्यादीच नव्हे तर आपले राजे, वजीर, हत्ती, उंट, घोडा एकाच डब्यात जाऊन बसतात. आणि डाव खेळताना एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असणारे दोन खेळाडूही हातात हात मिळवून पुन्हा मित्र बनतात, हीच या खेळाची खासियत आहे. हा खेळ संयम एकाग्रता आणि चपळतेचा असल्याचे मत जागृती हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी व्यक्त केले. बुद्धिबळ दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले होते.



स्वागत क्रीडा शिक्षक प्रकाश हारकारे यांनी केले. बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. पर्यवेक्षक शिवाजी अनावरे, रवींद्र भंडारे, सदानंद फुटाणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपमुख्याध्यापक उमेश सावंत, इराप्पा मरडी, अमित हिरेमठ यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी माने हिने केले. आभार वैष्णवी कुंभारी हिने मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.