Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव येथे घराची भिंत कोसळून साठ हजाराचे नुकसान


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
तालुक्यातील भडगाव येथे आज जोरदार पावसामुळे सकाळी साडेदहा वाजता आनंदा मारुती काब॔ळे यांच्या घराची भिंत कोसळली. यामुळे त्यांचे अंदाजे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले  आहे.



गडहिंग्लज तालुक्यात गेले दोन-तीन दिवस जोराचा पाऊस सुरू असल्याने घराच्या, गोठ्याच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तालुक्यात अशा जवळपास 23 घटना घडल्या आहेत. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी या ठिकाणी भेट देत पडझडीची माहिती घेतली. याबाबत प्रशासनाला कळविल्याचे त्यांनी सांगितले.



दरम्यान, गडहिंग्लज तालुक्यातील पावसाने पडझड झालेल्या घर व गोठा यांची प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. त्यामुळे पडझडीचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.