गडहिंग्लज (प्रतिनिधी): उत्तुंगतेज फाउंडेशन हिंगोली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक परीक्षेत जागृती गडहिंग्लज येथील जागृती हायस्कूलच्या कु. राजेश्विनी पाटील व श्रेयस पाटील या दोन विद्यार्थ्यांची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. ही निवड लेखी व मुलाखतीद्वारे करण्यात आली.
उत्तुंगतेज फौंडेशनचे संस्थापक रामेश्वर हालगे, एस. के. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत शिवाजी अनावरे यांनी तर प्रास्ताविक संपत सावंत यांनी केले. यावेळी रामेश्वर हालगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रयोगातून विज्ञान तसेच शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्ने उराशी बाळगावीत. विज्ञानाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढवावी यासाठी बाल विज्ञान संस्कार केंद्राची स्थापना केली असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, उपमुख्याध्यापक उमेश सावंत डॉ. आनंद पाटील, सौ. वर्षा पाटील, महंतेश दड्डी, सौ. आर. बी. मुल्ला, सर्व शिक्षक विद्यार्थी उपास्थित होते. सूत्रसंचालन सौ. एस. एन. कमतुरी यांनी तर आभार अनिल मसाळे यांनी मानले. यशस्वी विद्यार्थाचे डॉ. सतीश घाळी, अरविंद कित्तुरकर, ॲड. बी.जी. भोसकी, गजेंद्र बंदी व सर्व संचालकांनी कौतुक केले.


.jpg)
