Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या संत गजानन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची 'टिप्स' शस्त्रक्रिया यशस्वी

चंदगडच्या साठ वर्षीय रुग्णाला डॉक्टरांच्या टीमने दिले जीवदान


पुणे, मुंबईनंतर अशी शस्त्रक्रिया 'संत गजानन' मध्ये पहिल्यांदाच यशस्वी





गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज  सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच येथील डॉक्टरांच्या टीमने अत्यंत जोखीमेची व गुंतागुंतीची अशी 'टिप्स' शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने इंटरव्हेशन रेडिओलॉजी च्या माध्यमातून मानेच्या शिरेतील सूक्ष्म क्षिद्रातून अँजिओग्राफी द्वारे बिना टाक्याची चार तासाच्या अथक प्रयत्नातून यशस्वी करीत रुग्णाला जीवदान दिले. ही शस्त्रक्रिया शासकीय महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत झाली. 

 



चंदगड तालुक्यातील साठ वर्षीय रुग्ण किडनीच्या व्याधीने ग्रस्त होते. या रुग्णाला नियमित डायलेसिस सुरू होता. अचानकपणे रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. अति रक्तस्त्रावाने रुग्णाची परिस्थिती नाजूक होऊन ब्लड प्रेशर अत्यंत खालवले होते त्यामुळे जीवास धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीतच येथील डॉक्टरांच्या टीमने रुग्णाला दाखल करून घेऊन शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचे निर्धार केला. तातडीने एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, इंडॉस्कॉपी व रक्ताच्या चाचण्या केल्या. यामध्ये रुग्णाला जठरामध्ये रक्ताच्या मोठ्या गाठी झालेल्या आढळून आले. लिव्हरमधील मुख्य रक्तवाहिनीचे प्रेशर वाढल्याने या रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारचा आजार हा अत्यंत गंभीर ठरू शकतो व रक्तस्त्रामुळे रुग्णाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. अशा परिस्थितीत येथील डॉक्टरांच्या टीमने चार तासाच्या अथक कुशलतेने ही शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णाला जीवदान दिले.


'टिप्स' शस्त्रक्रिया म्हणजे नेमके काय?


लिव्हर व जठरमधील रक्तवाहिन्या मधील रक्तस्त्राव थांबण्यासाठी हिपॅटिक व्हेन व पोर्टल व्हेन या दोन मुख्य नलिका एकमेकांशी जोडण्याची शस्त्रक्रियेच्या प्रकाराला 'टिप्स' असे म्हटले जाते. अशा शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीचे असतात. या शस्त्रक्रिया पुणे व मुंबई येथील मोठ्या हॉस्पिटलमध्येच यशस्वी होतात. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र केवळ एक ते दोन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. पहिल्यांदाच येथे झालेल्या  शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी कोल्हापूर येथील नामवंत तज्ञ  डॉ स्वप्निल शहा व डॉ. पाटील, डॉ.विनायक, डॉ.यशवंत चव्हाण, भुलतज्ञ डॉ. प्रशांत कोरी, डॉ.सुरेखा चव्हाण, तंत्रज्ञ सुशांत यांचे सहकार्य लाभले. 



शस्त्रक्रियेच्या अत्याधुनिक सोयी सुविधा 'संत गजानन'मध्ये उपलब्ध!


अशा प्रकारच्या जोखीमेची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे डॉक्टर्स ,अत्याधुनिक उपकरणे व इतर सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून त्या शासकीय योजनेतून पूर्णपणे मोफत होत आहेत. तसेच पायातील ब्लॉकनसा व डायबेटिक फुट चे दोनशे हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया मोफत झाल्या आहेत तरी या सुविधेचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. यशवंत चव्हाण यांनी केला आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.