Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विठ्ठल नामाच्या जयघोषाने हलकर्णीतील वातावरण भक्तिमय

आषाढी एकादशी निमित्त गावातून काढली दिंडी


टोणपी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषेने वेधून घेतले सर्वांचे लक्ष 


रामलिंग भजनी मंडळाच्या हरिनामाचा गजराने ग्रामस्थ मंत्रमुग्ध  




गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (ता.गडहिंग्लज) येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. बी. एम. टोणपी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह, रामलिंग भजनी मंडळ, वारकरी व ग्रामस्थांच्या सहभागाने आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.



सकाळी पाटील गल्ली येथील विठ्ठल मंदिरात प्रतिमा पूजन जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावातीली प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली. 




बी. एम. टोणपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी  विठ्ठल- रुक्मिणी व वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. पांडुरंग, विठ्ठलाच्या केलेल्या जयघोषाने विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. यावेळी वारकरी वेशभूषेत महिलाही सहभागी होत्या. जय हरि विठ्ठल हरिनामाचा गजर करणारे रामलिंग भजन मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.



 

यावेळी दुंडाप्पा चौगुले, रामा सुतार, आप्पा पोवार, संजय चौगुले, बाळू मुंगुरवाडी, नारायण पाटील, शिवकुमार संसुद्धी, आप्पासाहेब टोणपी, दुंडप्पा रामाजगोळ, नागेश करडी, केंपाना चौगुले, ऋषीकेश पाटील, सुभाष जाधव, आप्पा पाटील, शिवजी नाईक, यांच्यासह वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.