भडगाव पुलावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरु
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीवरील निलजी बंधाऱ्यावर रविवारी रात्री उशिरा पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जरळी- दुंडगे या पर्यायी मार्गे वाहतूक सुरू आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता कोणीही ओलांडू नये असे आवाहन प्रशासनाने केले असून या मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.
हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने निलजी बंधाऱ्यावरील पाणी देखील वाढले असून पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. गडहिंग्लजमध्ये हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असले तरी भडगाव पुलावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे.
व्हिडिओ येथे पहा 👇


