Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कागल तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा



कागल (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कागल तालुक्यात विविध उपक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला. उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.




प्रारंभी कागल येथे श्री साईबाबा यांना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर एसटी आगार  परिसरात उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर नागरिकांना  मोफत दूध वाटप, तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.



यावेळी कागल तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक सेना शहर प्रमुख महाळूकरी कट्टी, वाहतूक सेना कागल तालुका अध्यक्ष नितीश डावरे, रामदास पाटील, वैभव मोडेकर, श्री. सावंत, बाळासाहेब पाटील व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




चिखली ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप 



कागल तालुकाप्रमुख जयसिंग टिकले यांच्या हस्ते चिखली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी उपतालुकाप्रमुख समीर देसाई, विभागप्रमुख अमृत पाटणकर, वैभव कांबळे, शाखाप्रमुख बाळकृष्ण चव्हाण, उपशाखाप्रमुख अनिल लोहार, राजाराम सुतार, रामचंद्र लोहार, सिताराम जाधव, श्रीमती सुमन लकडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.