पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रेही करण्यात आले प्रदान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील महागाव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेचे उदघाटन जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देखील प्रदान करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवराज पवार, युवासेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील अखलाख मुजावर, दिगंबर पाटील, स्नेहल पाटील, संदीप चव्हाण, कृष्णात कांबळे, राजकुमार भोगन, चंदू व्हरकटे, मल्लाप्पा चौगुले, प्रकाश रावळ, मीनाक्षी देसाई, मनोहर देसाई, आनंदा दिवटे, अर्जुन गाडीवड्ड, पांडुरंग चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, यावेळी तुकाराम पेडणेकर यांना शहर प्रमुख, अरुण कोकितकर यांना विभाग प्रमुख, सचिन मुळीक यांना शाखाप्रमुख पदाची नियुक्तीपत्रे देण्यात आली.



