गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील श्री गुड्डादेवीची यात्रा मंगळवार दिनांक ९ जुलै रोजी होत आहे.
या यात्रेत भडगाव- चोथेवाडी, बंदी वसाहत, बेरडवाडी, चव्हाणवाडी, भोई तळ, मरगुद्रीवाडी, मुकनारवाडी, समर्थनगर, दत्तनगर आदी वाड्यावस्त्यांतून भाविक मंगळवारी पहाटेपासून गरम पाण्याच्या घागरी घेऊन मंदिरात दाखल होतात. त्यानंतर देवीला अभिषेक घालून पूजा आरती करण्यात येते. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते.
या दिवशी सायंकाळी पाच वाजता गावातील गुड्डादेवी मंदिरापासून पालखी मिरवणूक निघते. मंदिरात आरती करून यात्रेची सांगत होते. भाविकांनी सहकार्य करून यात्रा उत्साहात व शांततेत पार पाडावे असे आवाहन श्री गुड्डादेवी यात्रा समितीने केले आहे.

