डी फार्मसीच्या उन्हाळी परीक्षेचा निकाल जाहीर
20 हुन अधिक विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या डी फार्मसीच्या उन्हाळी परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यामध्ये कोल्हापूरच्या न्यु वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी उज्वल यश संपादन केले.
प्रथम वर्षाचा निकाल ८८ टक्के लागला असून प्रथम वर्षे डी फार्मसीच्या कु. सिद्धी बाळासो सुतार (८०.३० टक्के ), कु. सोनल महेश वडणगेकर (७६.३० टक्के), कु. वैष्णवी बाळासो सुतार (७४.१० टक्के) व कु. निकत अयुब मुल्ला (७४.१० टक्के) यांनी अनुकमे प्रथम, द्वितीय व तृतीय कमांक पटकाविले. तर विशेष बाब म्हणजे २० हुन अधिक विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, चेअरमन के. जी. पाटील, व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजानीस वाय. एस्. चव्हाण यांनी विशेष अभिनंदन केले.
विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार, प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के, प्रा. वैष्णवी निवेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

