Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीचे सरपंच करवीर उथळे यांना 'महाराष्ट्र आयडॉल 2024' पुरस्कार जाहीर

१ सप्टेंबर रोजी पुणे येथील कार्यक्रमात होणार पुरस्काराचे वितरण 




गडहिंग्लज (प्रतिनिधी):  गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी गावचे सरपंच करवीर उथळे यांना राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जागृत शोध वृत्तपत्र यांच्यावतीने दिला जाणारा 'महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार 2024' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या संदर्भातील घोषणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर यांनी केली आहे. 



राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या वतीने 50 उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा हा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. सरपंच करवीर उथळे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेवून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १ सप्टेंबर रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंजपेठ पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.