Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हरळी बुद्रुक सिंबायोसिस स्कूलमध्ये डॉ. शां. ब . मुजुमदार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): सिंबायोसिस स्कूल हरळी बुद्रुक येथे भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आणि सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा  ९०वा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.



वाढदिवसानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील ज्येष्ठ मान्यवर आणि स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य अरुण हरळीकर, राजाराम पाटील, संजय पाटील यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तर वाढदिवसाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यानी वाढदिवसाचे शुभेच्छा कार्ड, रंगीत कागदी फुले आणि पुष्पगुच्छ  व केकच्या चित्रांच्या रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी कविता कागिनकर, राजेंद्र शेलार, रावसाहेब मुरगी, संतोष आंबी, अतुल अहिरे, अशोक पाटील,दिगंबर पाटील, यलाप्पा कोळी, दत्ता गोंधळी, इंद्रजीत पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.