Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अथर्व-दौलतचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी घेतली सौ. गिरिजादेवी शिंदे- नेसरीकर यांची भेट



गडहिंग्लज (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीचे वेध जसजसे जवळ येवू लागले आहेत तसे चंदगड विधानसभा मतदारसंघात बऱ्याच घडामोडींना वेग आला असून अशातच चंदगड विधानसभा मतदारसंघातून अथर्व-दौलतचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी विधानसभा निवडणूक घडवण्याची तयारी दर्शवल्याने चंदगड मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

 


त्यातच अथर्व-दौलतचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी अल्पावधीतच आपली राजकारणात छाप पाडून लोकसभा निवडणूक काळात नेसरी जिल्हा परिषद मतदार संघातील आपला दबदबा निर्माण करून छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या विजयात या मतदारसंघात मोलाचा वाटा उचलला आणि आगामी काळात राजकारणात संधी निर्माण केलेल्या नेसरीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. गिरिजादेवी संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर (वहिनीसाहेब) यांची शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट घेवून निवडणुकीच्या अनुषंगाने व आगामी वाटचाली संदर्भात अनेक विषयांवर चर्चा केली असल्याचे समजते. याप्रसंगी देवस्थान स्थानिक उपसल्लागार समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.