Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील पोलिसपाटील पदांसाठी सोमवारी आरक्षण सोडत

गडहिंग्लज तालुक्यातील 20 तर चंदगड तालुक्यातील 35 गावांचा समावेश 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील २० तर चंदगड तालुक्यातील ३५ गावे असे एकूण ५५ गावांच्या पोलिसपाटील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता गडहिंग्लज पंचायत समितीच्या बचत भवनात होणार आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिली.



गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी, नंदनवाड, नौकुड, शिंदेवाडी, बुगडीकट्टी, बेकनाळ, जखेवाडी, बेळगुंदी, तारेवाडी, यमेहट्टी, हसूरवाडी, वैरागवाडी, अरळगुंडी, मांगनूर तर्फ सावतवाडी, लिंगनूर क। नेसरी, येणेचवंडी, चंदनकुड, इंचनाळ, लिंगनूर क। नूल. 



चंदगड तालुक्यातील होसूर, दिंडलकोप, दुंडगे, यर्तेनहट्टी, इब्राहिमपूर, गवसे, ढोलगरवाडी, सुळये, इनाम कोळींद्रे, पिळणी, कानडी, शिरोली, शिवणगे, तुडये, खा. सावर्डे, आंबेवाडी, पोरेवाडी, बुक्कीहाळ, दाटे, मिरवेल, कोदाळी, रायंदेवाडी, कुरणी, रामपूर, भोगोली, सत्तेवाडी, मोटणवाडी, उत्साळी, हेरे, कानूर बु., घुल्लेवाडी, विंझणे, मोरेवाडी, पोवाचीवाडी, मलगेवाडी या गावांचा समावेश आहे. आरक्षण सोडतीला संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.