नंदनवाड येथे दिपक पुजारी व भरत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मतदार संघातील विविध समस्या, लोकांच्या मागण्या विकास कामातून पूर्ण करताना कोट्यावधीचा निधी खेचून आणला. सर्वसामान्यांसाठी वाहून घेऊन काम करताना कधी माझं घर, माझं कुटुंब, माझी संपत्ती असा विचारही कधीच मनात आला नाही, विकास कामांच्या माध्यमातून सच्चे प्रामाणिक कार्यकर्ते जपली आणि तीच आहेत माझी खरी मालमत्ता असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.
नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथील जिल्हा मजूर संघाचे संचालक दिपक पुजारी व राधाकृष्ण शिक्षक पत संस्थेचे चेअरमन भरत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थावरून आमदार राजेश पाटील बोलत होते.
आमदार राजेश पाटील पुढे म्हणाले, कै. सदाशिवराव मंडलिक, कै. नरसिंगराव पाटील, कै. बाबासाहेब कुपेकर यांनी उभी केलेली प्रमाणिक कार्यकर्त्यांची फळी जोपासणे हे माझे कर्तव्य समजतो, त्यामुळे माझे कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि राहतील यात कोणतीच शंका नाही. यावेळी आमदार पाटील यांनी दिपक पुजारी व भरत पाटील यांच्या समाजकार्याचे कौतुक केले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
स्वागत राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष जयसिंग चव्हाण यांनी केले. गावच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार पाटील यांचे सत्कार सर्व ग्रामस्थांनी केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी, भरत पाटील, दिपक पुजारी यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी पं. स.चे माजी सभापती इकबाल काजी, बाजार समितीचे संचालक अभयदादा देसाई, संचालक बाबुराव चौगुले, वसंतकाका चौगुले, सरपंच शुक्राचार्य चोथे, विक्रांत नाईक, पी. एम.चव्हाण, बसर्गे सरपंच भारती रायमाने, विक्रम पाटील, कवळीकट्टी सरपंच आनंदा पाटील, एस. एल. पाटील, सातगोंडा जिन्नानावर, शिवानंद देसाई, युवा उद्योजक शिवकुमार संसुद्धी, प्रसाद जोशी, नारायण पाटील, नागाप्पा पाटील, काका देसाई, सुनिल पाटील, अन्वर कलावंत, बाळासाहेब मूर्ती, सागर शिंदे, कुमार देसाई, रमेश कलगोंडा, किशोर राऊत, सुशांत नौकुडकर, भारत टोनपी, मयुर दड्डीकर, सागर शिंदे, स्वप्निल अक्कोळे, श्रीमंत पुजारी उपस्थित होते. आभार बसवराज पुजारी यांनी मानले.





