Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी ग्रामपंचायतीकडून नाईक समाजाला स्टीलचे स्ट्रेचर प्रदान

स्मशानभूमीत पत्र्याचे शेड देखील उभारल्याबद्दल समाज बांधवांकडून समाधान व्यक्त




गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी ग्रामपंचायतीच्या वतीने नाईक समाजाच्या स्मशानभूमीत स्टीलचे स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर स्ट्रेचर नाईक समाजाकडे सुपूर्द करण्यात आले. यापूर्वी ग्रामपंचायतीने नाईक समाजाच्या स्मशानभूमीत पत्र्याचे शेड देखील उभारल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने ग्रामपंचायतीचे आभार मानण्यात आले. आता स्टीलचे स्ट्रेचर देखील उपलब्ध केल्याने सोय झाली आहे.



समाजातील एखादी व्यक्ती मयत झाल्यास अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे घेऊन जाण्यासाठी बांबूच्या साह्याने स्ट्रेचर तयार करावे लागत होते. रात्री-अपरात्री अशी घटना घडल्यास समाज बांधवांना बांबूची शोधाशोध करावी लागत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नाईक समाजासाठी कायमस्वरूपी स्टीलचे स्ट्रेचर उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर यापूर्वी ग्रामपंचायतीने मागासवर्गीय फंडातून स्मशानभूमीत पत्र्याचे शेड देखील उभे करून दिले आहे. त्यामुळे समाज बांधवांची स्मशानभूमीतील गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या सोयीबद्दल समाज बांधवातून समाधान व्यक्त होत आहे.



यावेळी सरपंच करवीर उथळे, उपसरपंच सौ. सोनव्वा कतीगार, सदस्य मोसिम मुल्ला, रमेश पुजेरी, अर्जुन कांबळे, सदस्या सौ. अंजना निंबाळकर, सौ. दीपा नरेवाडी, श्रीमती अक्काताई हजेरी, सौ. करिष्मा मुल्ला,  सौ. मंजुळा चौगुले यांच्यासह तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू इंगवले, मारुती कतीगार, महादेव तेगनाळे, रवींद्र नाईक, अर्जुन नाईक, साताप्पा पुजेरी, भरमा नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धाप्पा धनगर, सुरेश भोई यांच्यासह नाईक समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.