शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी
संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल महागाव, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथे संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल महागाव , ग्रामपंचायत व आरोग्य विभाग तेरणी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. सदर शिबिर तेरणी आरोग्य उपकेंद्रात पार पडले. या शिबिरात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरपंच करवीर उथळे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.
या आरोग्य शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, जनरल चेकअप, ईसीजी करणे, हृदयरोग (कार्डिओलॉजिस्ट) संबंधातील तपासण्या करण्यात आल्या. या आजारांवरील पुढील सर्व तपासण्या एसजीएम हॉस्पिटल महागाव येथे होणार आहेत.
यावेळी डॉ. सायली सांगरुळकर व त्यांची टीम, तेरणीचे सरपंच करवीर उथळे, उपसरपंच सोनवा कतीगार, सदस्य रमेश पुजेरी, अक्काताई हजेरी, तेरणी उपकेंद्रातील बेबी पाटील आरोग्य सहायिका जयश्री कांबळे, परिचारिका, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने शंभरहून अधिक ग्रामस्थांनी हेल्थ चेक अप कॅम्पचा लाभ घेतला.

.jpg)