स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या रक्तदान शिबीर
78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 78 वृक्षांचे करण्यात येणार रोपण
जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील लकी खिदमत फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी रक्तदान तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात सहभागी रक्तदात्यांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे. लकी खिदमत फाउंडेशन व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन व पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या समारंभास तहसीलदार ऋषीकेत शेळके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, एमएसईबीचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके, विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७८ वृक्षांची संकेश्वर रोडलगत लागवड केली जाणार आहे.

