विविध क्षेत्रातील मान्यवरांचा करण्यात आला सन्मान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): बुगडीकट्टी (ता.गडहिंग्लज) येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गावातील आदर्श व्यक्तिमत्त्वांना 'सरपंच अवॉर्ड' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी सेवा संस्थेचे चेअरमन अनिल देसाई (इनामदार) हे होते.
प्रास्ताविकात सरपंच दयानंद देसाई यांनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन विभागाचे आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याचे नमूद केले, तसेच गावातील सुरू असलेल्या विविध योजनांचा व विकास कामांचा आढावा घेतला.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांची कमिटीद्वारे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये आदर्श शिक्षक - प्रकाश रामू कुंभार, संभाजी तुकाराम कोन्नुरे, एम.आय. जकाती. आदर्श विद्यार्थी/ विद्यार्थिनी-संस्कृती संतोष सत्तेगिरी, विराज संतोष पाटील, सोमेश मल्लाप्पा नाईक, आदर्श ग्रामसेवक - सौ. सुजाता किशोर पाटील. आदर्श कोतवाल - दशरथ भीमसेन कुणके.
जिल्हास्तरीय बुद्धिबळ खेळाडू-प्रांजल दत्तात्रय पाटील, आदर्श आशा कार्यकर्ते - सौ. साधना शिवाजी हगवणे. आदर्श अंगणवाडी सेविका - सौ . सुनिता संजय निकम, आदर्श मदतनीस - शारदा सदाशिव पाटील.
आदर्श बचत गट - वैभव लक्ष्मी महिला स्वयं सहायता समूह, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी-सायली संभाजी कोनुरे. यांना 'सरपंच आवर्ड'हा पुरस्कार सरपंच देसाई व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आले.
यावेळी स्पर्धा परीक्षेतून कॅनल इन्स्पेक्टर पदी निवड झालेबद्दल प्रभाकर सिद्धाप्पा हेब्बाळे यांचे ग्रामपंचायत तर्फे विशेष सत्कार करण्यात आले. याचबरोबर विद्यामंदिर बुगडीकट्टी शाळेतील नवोदय, गुरुकुल, प्रज्ञाशोध, समूह नृत्य, क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मायाप्पा धनगर, ज्योतिबा हुबळे, रामा हुदली, मंगल देसाई, गौरा राजगोळे, पूजा धनगर, क्षितिजा नाईक, रुद्राप्पा देसाई ,आनंदा पाटील, भीमराव हगवणे, रामा राजगोळे, विठ्ठल राजगोळे, वसंत नाईक, आप्पासाहेब पाटील, संतोष सत्तेगिरी, इराप्पा हुगाई, आजी-माजी सैनिक संघटना , मानवता फाउंडेशन, सेवा संस्था व दूध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आप्पासाहेब कोळवी यांनी केले.







