मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची देखील करण्यात आली निवड
अध्यक्षपदी सुरेश लांडे तर उपाध्यक्षपदी संभाजी मांगले यांची निवड
मुंबई : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे करी रोड मुंबई शाखा अध्यक्ष श्री. दळवी व उपाध्यक्ष श्री. गौरव यांच्या उपस्थितीत तेरणी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव अत्याळे यांच्या निधनाबद्दल त्यांना ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. सामाजिक जाण असणारे व्यक्तिमत्व हरपल्याने दुःख व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणी निवडण्याचे ठरले. त्या अनुषंगाने कार्यकारिणी निवड करण्यात आली. सदर निवड ही गुप्त मतदान पद्धतीने करण्यात आली.
तेरणी ग्रामस्थ मंडळ हे नोंदणीकृत मंडळ आहे. या मंडळाचे एकूण 130 सभासद आहेत. मुंबई येथील योगेश्वर बिल्डिंग, ना. म.जोशी मार्ग येथे हे मंडळ आहे.
मंडळाची नवी कार्यकारिणी अशी - अध्यक्षपदी सुरेश लांडे, उपाध्यक्ष पदी संभाजी मांगले, सेक्रेटरी सदानंद आसवले , सहा.सेक्रेटरी संतोष मगदुम, खजिनदार आनंद आसवले, सदस्यांमध्ये राजाराम नाईक, रामदास सावेकर, करवीर जाधव, दिनकर जाधव, कृष्णा मांगले, दुंडाप्पा नरेवाडी, सल्लागार म्हणून विठ्ठल नरेवाडी, सखाराम मांगले यांचा समावेश आहे.



.jpg)




.jpg)