गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील बी. एम. टोणपी मराठी विद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रतिमापूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ए. ए.पाटील यांनी लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी ए. बी. लवटे, के. डी. पाटील, पी. एम. पाडवी, पी. एम. भोसले, एस. बी. भोई, एस. एस. मुल्ला, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

