Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी यांना 'आदर्श पोलीस पाटील पुरस्कार' जाहीर



गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव (ता गडहिंग्लज) येथील पोलीस पाटील उदय पुजारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'आदर्श पोलीस पाटील' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या कोल्हापूर येथील शासकीय ध्वजारोहनावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


 पोलीस पाटील उदय पुजारी यांनी गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे उत्कृष्ट कार्य आजपर्यंत करत आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर असतात. त्यांच्या या विविध कार्यांचा दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.