हलकर्णी महाविद्यालयात बालवाडी शिक्षिका कोर्ससाठी प्रवेश सुरू
शासकीय नोकरीसाठी उपयुक्त कोर्स करण्याची महिलांना सोय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील हलकर्णी महाविद्यालयास बालवाडी शिक्षिका कोर्स सुरु करण्यास शिवाजी विद्यापीठाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या महाविद्यालयात या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष एम.जी. पाटील, प्राचार्या सौ. बिस्मिल्ला मुल्ला यांनी दिली.
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे बस स्टँड जवळ तेरणी रोडवर अंकली बिल्डिंग येथे हलकर्णी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयाला कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने बालवाडी शिक्षिका कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या महाविद्यालयात या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशासाठी किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण अट आहे. बारावी व पदवीधर उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. गडहिंग्लज तालुक्यात आता हलकर्णी महाविद्यालयातच बालवाडी शिक्षिका कोर्स सुरू झाल्याने तालुक्यातील महिलांना हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सप्टेंबर पासून या कोर्सची सुरुवात होत आहे. शासकीय नोकरीसाठी हा कोर्स उपयुक्त असल्याने जास्तीत जास्त महिलांना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक महिलांनी 7387066034, 8805548546 अथवा प्राचार्या सौ. बिस्मिल्ला मुल्ला 7420868419 व अध्यक्ष एम. जी. पाटील 9604136181 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

