Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्या वरदानच!

डॉ. प्रतिभा चव्हाण यांचे प्रतिपादन 


'संत गजानन'च्या रानभाजी प्रदर्शनातून आरोग्य जनजागृतीचा संदेश





गडहिंग्लज (प्रतिनिधी): रानभाज्यांमधील पौष्टितेबद्दल आजच्या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्या दुरावल्या आहेत. धावपळीच्या युगात नागरिक फास्टफूडकडे जास्त आकर्षित होत आहे. या रानभाज्या शरीरासाठी औषधी व उपयुक्त असून आपल्या सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्याचे सेवन हे वरदान असल्याचे प्रतिपादन गडहिंग्लज तालुका स्त्री रोग प्रस्तुती संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रतिभा चव्हाण यांनी गडहिंग्लज येथे महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाने आयोजित औषधे रानभाज्या प्रदर्शनाच्या उदघाटना प्रसंगी केले.



स्वागत प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यांनी केले. दोन दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनात नागरिक, विद्यार्थी व गृहिणीचा उदंड प्रतिसाद मिळाला. पूर्वीच्या दुर्मिळ अशा चाळीसहून अधिक रानभाज्याचे मांडणी केली होती. त्यांचे औषधी गुणधर्म व ते कसे बनवायचे याची माहिती महाविद्यालयाचे विद्यार्थी देत होते. ही माहिती जाणून घेण्यासाठी तालुक्यातील जाणकार व आबालवृद्धानी मोठी गर्दी केली होती. तसेच महाविद्यालयाने स्वतः बनवलेल्या विविध उत्पादन खरेदीला आहे प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात कुडा, सुरण, बांबू, पिंपळ, निरफणस, पाथरी, काटेमाठ या भाज्या लक्षवेधी ठरल्या.




यावेळी राजेंद्र तारळे , प्राचार्य रोहिणी पाटील, रूपा दड्डी, डॉ. मंजुषा देशपांडे, डॉ. मृणाल सुतार, डॉ स्मिता ढबू ,डॉ. प्रीती माने प्रा. अर्चना मगदूम आदींनी प्रदर्शनास भेट देऊन माहिती घेतली. संगीता मनगुळे यांनी आभार मानले.




प्रदर्शन मोठ्या प्रमाणात भरवावी!



भाजी म्हटले की अळू, मेथी,पालक, चाकवत या पालेभाज्या आणि कोबी, फ्लॉवर, बीट, तोंडली अशा  मोजक्याच ठराविक भाज्याचे नावे आपल्याला माहीत असतात मात्र कधीही न ऐकलेले अशा भाज्याचे माहिती, बनवण्याची पद्धत याची माहिती  घेण्याची संधी या प्रदर्शनातून मला मिळाली याबद्दल आभारी आहे. तसेच आयोजन दरवर्षी मोठ्या प्रमाणात करण्यात यावी.

                                  - सौम्या गुंजाटी, गृहिणी



नवीन भाज्या बनवण्याची माहिती मिळाली! 




नव्या पिढीला रानभाज्याची ओळख , संवर्धन तसेच रोजच्या आहारात वापर वाढवणे गरजेचे आहे. सशक्त पिढी घडवण्यासाठी रानभाज्याची गरज आहे. याची माहिती मला या प्रदर्शनातून  मिळाली. न ऐकलेल्या भाज्याचे रेसिपी ही मला कळाली.

                                 -लक्ष्मी चौगुले, गृहिणी




 जनजागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजन!



आयुर्वेदात महत्त्वाचे व गुणकारी असणारे भाज्या  शेतातून आपण कचरा म्हणून टाकून देतो. या भाज्या अनेक व्याधीवर गुणकारी औषध म्हणून वापर केला जातो. फास्ट फूड सेवन करणाऱ्या सर्व नागरिकांना या रानभाज्यांचे महत्त्व माहिती सर्वांनी मिळवी या उद्देशाने हा प्रदर्शन भरवला आहे यासाठी नागरिकांच्या प्रतिसाद पाहता पुढील वर्षी याची व्याप्ती वाढवून प्रत्येकांच्या घरापर्यंत हा मौल्यवान संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

                             -डॉ. मंगल मोरबाळे, प्राचार्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.