मंडल कृषी अधिकारी हरीदास बोंगे यांचा सल्ला
महागावच्या महात्मा फुले विद्यालयात कृषी विद्याविषयक मार्गदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारत कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील युवा पिढीने शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून शेतीक्षेत्राकडे आकर्षित व्हावे. तसेच पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी.त्याची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांपासून व्हावी. यासाठी "फाली" (फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया) या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राचे धडे दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने कृषी क्षेत्राकडे करिअरची संधी म्हणून पाहा असा सल्ला महागाव कृषी मंडल अधिकारी हरिदास बांगे यांनी दिला.
महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये फाली विभागामार्फत आयोजित व्याख्यानात बोलत होते.अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक मोहन कांबळे होते.
स्वागत व प्रास्ताविक कृषी शिक्षक प्रथमेश शेळके यांनी केले. श्री बोंगे बोलताना पुढे म्हणाले, विद्यार्थी मध्ये जिदण्यासू वृत्ती आहे आणि त्यामुळे शेडनेटमध्ये प्रत्यक्ष शेती करत या क्षेत्रातील ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत होत आहे. तसेच त्यांनी पीक उत्पादन व व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, एकत्रित शेती पद्धत,शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना,पिकासाठी पोषक घटक व कमतरता याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन सानिका कोकितकर तर प्रणाली जाधव हिने मानले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



