Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पुलावर अद्याप पाणी जैसे थे ; वाहतूक अजून बंदच

भडगाव : भडगाव पुलावर पुराच्या पाण्याची पातळी स्थिर असून अद्याप पाणी 'जैसे थे' आहे. आज सकाळी सव्वा सहा वाजता भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी यांनी टिपलेले हे छायाचित्र.


गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भडगाव पुलावर हिरण्यकेशी नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी अद्याप जैसे थे आहे. त्यामुळे पुलावरून वाहतूक अजूनही बंदच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गडहिंग्लज - चंदगड मार्गावरील वाहतूक ठप्पच आहे.



भडगाव पुलावर काल दुपारी पुन्हा पाणी आल्याने साडेतीनच्या सुमारास वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाण्याच्या पातळीत घट होत नसल्याने पुलावरील पाणी तेवढेच आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कालपासून बंद केलेली वाहतूक अजूनही बंदच ठेवली आहे. आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी यांनी पाण्याची पाहणी केली. पुराच्या पाण्यावर त्यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनची टीम व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.