Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पुलानजीक पुन्हा खड्डा ; भराव गेला वाहून



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गेल्या आठवड्यात पूरस्थितीमुळे हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलानजीक पडलेला खड्डा खडक मातीने भरण्यात आला होता. मात्र कालपासून पुलावर पुन्हा पाणी आल्याने हा भराव वाहून गेल्याने हा खड्डा उघडा पडला आहे. त्यामुळे इथून वाहतूक करणे पुन्हा धोक्याचे झाले आहे. हा खड्डा पुन्हा पाण्यात असल्याने काँक्रीटने दुरुस्ती करणे अशक्य होणार आहे. पुलावर पाण्याची पातळी जरी कमी असली तरी दुचाकी चालकांना खड्ड्यामुळे दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हा खड्ड्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे. या संदर्भात भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे.


     व्हिडिओ येथे पहा 👇👇


भडगाव : भडगाव पुलावर सध्या अशी पाण्याची पातळी आहे. पहा व्हिडिओच्या माध्यमातून  ( व्हिडिओ सौजन्य : वसंत नाईक, भडगाव ) 👆👆 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.