गडहिंग्लज (प्रतिनिधी): काल दुपारपासून पाणी आल्याने बंद असलेली भडगाव पुलावरील वाहतूक आज दुपारपासून पुन्हा पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे गडहिंग्लज - चंदगड मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. कालपासून वाहतूक बंद होती त्यामुळे बऱ्याच जणांची गैरसोय झाली. दरम्यान, पुलावर एकदम कमी पाण्याची पातळी असताना देखील रस्ता रहदारीस खुला न केल्याने गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण यांनी आक्रमक होत वाहतूक सुरू करण्यास भाग पाडले.



