
महागाव : संत गजानन फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी शिवाजी विद्यापीठात गुणवत्ता यादीत यश संपादन केल्याबद्दल प्राचार्य डॉ. अन्सार पटेल व शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत यश मिळवत महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे.
यामध्ये अंतीम वर्षातील मिसबाह सय्यद या विद्यार्थिनीने (8.89) ग्रेड मिळवून नववा तर मयुरी सुतार हिने (8.87) ग्रेड मिळवून दहावा क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अन्सार पटेल व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
