आयुर्वेद टीचर्स असोसिएशनच्या वतीने पुणे येथील राष्ट्रीय परिषदेत पुरस्कार प्रदान
![]() |
| पुणे : येथे झालेल्या सहाव्या राष्ट्रीय परिषदेत डॉ सारिका देवरे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देताना आयोगाचे अध्यक्ष डॉ. रघुराम भट्ट, आमदार जयंत आसगावकर व इतर मान्यवर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाच्या काय चिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सारिका देवरे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आला. आयुर्वेद टीचर्स असोसिएशनच्या वतीने हा पुरस्कार पुणे येथे झालेल्या सहाव्या राष्ट्रीय परिषदेत देण्यात आला.
पुणे येथे आयुर्वेदिक टीचर्स असोसिएशन तर्फे भारतीय औषध प्रणाली राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक. तसेच एम.सी. आय.एम. मुंबई यांच्या सहयोगाने आयुर्वेदातील नवी क्षितिजे या विषयावर दोन दिवस सहावा राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होता यामध्ये डॉ. देवरे यांना शिक्षण व आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाचे अध्यक्ष डॉ रघुराम भट्ट यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला .
यावेळी आमदार जयंत आ, डॉ. राहुल सूर्यवंशी, डॉ. नितीन चांदुरकर, डॉ. नितीन वाघमारे, डॉ. प्रदीपकुमार जोंधळे, डॉक्टर सचिन चांडलिया डॉ. क्षितिजा शिंदे, डॉ संदीप जाधव, डॉ. प्रमोद खोब्रागडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या पुरस्काराबद्दल संस्थाध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण,डॉ. यशवंत चव्हाण यांनी अभिनंदन केले.

