वृक्षारोपण करत पर्यावरण रक्षणाचेही केले काम
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; 90 जणांनी केले रक्तदान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील लकी खिदमत फौंडेशन, ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशन व पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्या संकल्पनेने रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण ९० जणांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. दरम्यान, फौंडेशनच्या कार्यालयाचे उदघाटन व वृक्षारोपण कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी ७८ वृक्षांचे देखील रोपण करण्यात आले.
प्रारंभी संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, एम. एस. ई. बी. चे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके उपस्थित होते.
कार्यप्रमाचे प्रास्ताविक मौलाना मुबारक नाईकवाडे यांनी केले.यावेळी इम्रान पटेल, असर नंदीकर, ठाकरे पक्ष शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष चिकोडे, सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी, माजी नगरसेवक हारुण सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार इक्वाल नंनदीकर यांनी मानले. सुत्रसंचालन सुरेश दास यांनी केले.



