Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हरळी खुर्द तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अरुण पाटील

गडहिंग्लज तालुक्यात पहिल्यांदाच मतदानाद्वारे करण्यात आली निवड 


अरुण पाटील 85 मतांनी झाले विजयी 


निवडीनंतर गुलालाची उधळण करत ग्रामस्थांचा जल्लोष 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): हरळी खुर्द गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच अरुण दत्तात्रय पाटील यांची मतदानाद्वारे निवड झाली. सिताराम पाटील  व अरुण पाटील या दोघांमध्ये लढत झाली. अरुण पाटील यांचा 85 मतांनी विजय झाला. ही निवड प्रक्रिया सरपंच सौ. साधना ऐवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गडहिंग्लज तालुक्यात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच मतदानाद्वारे अशी निवड करण्यात आली. या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते.






यावेळी उपसरपंच चंद्रकांत राजे, गोड साखरचे माजी संचालक बाळकृष्ण परीट, माजी सरपंच चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच नारायण पाटील, माजी सैनिक जयसिंग पाटील, गजानन पाटील, दिलीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मतदानाची प्रक्रिया ग्रामसचिव संदीप आदमापुरे यांनी पार पाडली. अरुण पाटील यांच्या विजयानंतर गुलालाची उधळण करत ग्रामस्थांनी जल्लोष केला. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.