Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथे उद्या औषधी रान भाज्यांचे प्रदर्शन

'संत गजानन आयुर्वेद'च्या वतीने आयोजन 


नागरिकांना मिळणार अमूल्य माहितीचा खजिना





गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील महालक्ष्मी मंदिर आवारात उद्या गुरुवार (दि. 29) रोजी सकाळी दहा वाजता महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने आयोजित औषधी रानभाज्या प्रदर्शनाचे संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रतिभा चव्हाण व डॉ. सुरेखा चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. तर डॉ. यशवंत चव्हाण, डॉ.संजय चव्हाण, ॲड.बाळासाहेब चव्हाण, राजेंद्र तारळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 




अलीकडच्या फास्ट फूड व बदलत्या आहारात औषधी रानभाज्यांचे सेवन दुर्मिळ होत चालला आहे. आरोग्याच्या दृष्टीने या आरोग्यवर्धक भाज्या विपुल प्रमाणात उपलब्ध असूनही त्यांचे गुणधर्म महत्त्व किंवा ते कसे बनवायचे याबद्दल आज अनेकजण अनभिज्ञ आहेत हीच बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाने प्रदर्शनाद्वारे नागरिकांना जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे प्रदर्शन उद्या गुरुवार ( दि. 29) व शुक्रवार (दि. 30) रोजी सकाळी दहा ते एक व सायंकाळी चार ते सात या दोन सत्रात भरणार आहे. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षकाकडून उपयुक्त माहिती मिळणार आहे. तरी सर्व नागरिक, विद्यार्थी,महिलावर्ग मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. मंगल मोरबाळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.