Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बँकांनी 'लाडक्या बहिणींचे' पैसे कापून घेतल्यास कडक कारवाई!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'लाडक्या बहिणींना' आणखी एक दिलासा 


बंद असलेल्या खात्यांवर पैसे जमा झाल्यास दंडाची रक्कम कपात न करण्याची सूचना 




कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद असलेल्या महिलांच्या खात्यावर जमा झाल्यास बँकांनी दंडाची रक्कम कपात करून घेऊ नये अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे काल झालेल्या वचनपूर्ती सोहळा  कार्यक्रमात दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक दिलासा दिल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आधार लिंक असलेल्या महिलांच्या खात्यावर झाले. मात्र काही महिलांच्या खाती बंद असलेल्या या खात्यांवर जमा झाल्याने काही बँकांनी दंडाची रक्कम म्हणून यातील पैसे कापून घेतले होते, एक ते दोन वर्ष बंद असलेल्या खात्यांची माहिती बँकांनी आधारला देणे बंधनकारक आहे मात्र तसे न झाल्याने पैसे जमा झाल्यानंतर दंडाची रक्कम कपात करण्यात आली आहे,  या समस्येकडे भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदनातून लक्ष वेधले होते.



या पार्श्वभूमीवर काल कोल्हापूर येथील लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या समस्येची दखल घेत लाडकी बहीण योजनेचे पैसे दंड स्वरूपात, थकीत कर्जाच्या स्वरूपात बँकांनी कापून घेतल्यास कडक कारवाई करण्याचा इशार देत दंड न लावता शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना बँकांनी द्यावा अशा सूचना दिल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.