Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदनवाडचे सामाजिक कार्यकर्ते दिनकर पुजारी यांनी जपली सामाजिक बांधिलकी

मगदूम वसाहतीतील रहिवाशांना स्वखर्चाने पाणीपुरवठा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील नंदनवाड गावातील मगदूम वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न स्वखर्चाने सोडवत सामाजिक कार्यकर्ते दिनकर पुजारी यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामपंचायतीकडून जोपर्यंत पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत स्वतःच्या वाहनाने स्वखर्चाने पाणीपुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऐन पावसाळ्यात  मगदूम वसाहतीतील ग्रामस्थांचे पाण्यासाठी होणारे हाल दिनकर पुजारी यांच्यामुळे थांबल्याने समाधान व्यक्त होत आहे.



राज्यात सर्वत्र मुसळधार पर्जन्यमान झालेले असताना देखील गडहिंग्लज तालुक्याच्या दुष्काळी पूर्व भागात असणाऱ्या नंदनवाड गावामध्ये मगदूम वसाहतीतील रहिवाशांना पाण्याची समस्या जाणवत होती. हाकेच्या अंतरावर पाण्याचा तलाव असून देखील ऐन पावसाळ्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित झालेला होता. येथील रहिवाशांनी वारंवार ग्रामपंचायतकडे पाठपुरावा देखील केला होता. मात्र समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते.




येथील रहिवाशांचे होत असलेले हाल नंदनवाड गावातील सामाजिक कार्यकर्ते दिनकर पुजारी यांच्या लक्षात येताच त्यांनी येथील रहिवाशांची पाण्यासाठीची होणारी वणवण थांबवण्यासाठी स्वखर्चाने, स्वतःच्या ट्रॅक्टरने मगदूम वसाहतमध्ये पाणीपुरवठा केला. ग्रामपंचायत जोपर्यंत पाणीपुरवठा करणार नाही तोपर्यंत मगदूम वसाहतीला पाणीपुरवठा करण्याची नैतिक जबाबदारी आपण स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते दिनकर पुजारी यांच्या या समाजकार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.